Vasamat Accident Saam tv
महाराष्ट्र

Vasamat Accident : चालकाने ब्रेक ऐवजी क्लच दाबला; दहा फूट लांब ओढत दोघांना चिरडले, वसमतमधील थरारक घटना

Hingoli News: हिंगोलीच्या वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत कार चालकाने फुटपाथवर उभ्या असलेल्या दोघांना दहा फूट लांब चिरडत घेऊन गेल्याची घटना घडली आहे.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या वसमतमध्ये कार चालकाने दोघांना चिरडल्याची थरारक घटना घडली आहे. कार चालकाने ब्रेक ऐवजी क्लच दाबल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात दोघांना धडक देऊन उडवत दहा फूट अंतरापर्यंत ओढत नेले. इतकेच नाही तर कार चालकाने गाडी न थांबविता. सुसाट कार नेत एकाच्या डोक्यावरून कार नेली. या घटनेत एकजण गंभीर, तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. 

हिंगोलीच्या वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत कार चालकाने फुटपाथवर उभ्या असलेल्या दोघांना दहा फूट लांब चिरडत घेऊन गेल्याची घटना घडली आहे. झेंडा चौक परिसरात झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्याने हा अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रत्यक्षदर्शिनी देखील या थरारक अपघाताची माहिती दिली आहे.  

दहा फुटापर्यंत ओढत नेले 

दुकानाच्या पुढे उभे असताना काही क्षणात अपघातग्रस्त कार दोघांना चिरडत पुढे घेऊन गेली. धक्कादायक म्हणजे कार चालकाने अपघाताच्या घटनेनंतर कार जागेवर न थांबवता जखमींच्या डोक्यावरून नेल्याचे देखील अपघाताच्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आता कार चालक प्रदीप टाक याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांकडून आरोग्य प्रशासनाला पत्र
वसमतमध्ये झालेल्या थरारक अपघातग्रस्त कारमध्ये ड्रायव्हिंग करत असलेल्या प्रदीप माणिकराव टाक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याने मद्यप्राशन केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पोलिसांनी कार चालकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य प्रशासनाला पत्र दिले आहे. कार चालकाच्या रक्ताचे नमुने देखील आता प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख इलियास यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT