Hingoli Accident Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Accident : रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची रिक्षाला धडक; ७ प्रवासी जखमी

Ambulance Accident at Hingoli: रुग्णवाहिका व प्रवासी ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. हिंगोली शहरातील नाईक पेट्रोल पंपाच्या पुढे झालेल्या या अपघातात रिक्षामध्ये प्रवास करणारे सहा जण जखमी झाले

संदीप नागरे

हिंगोली : रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची समोरून येणाऱ्या प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षामधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. तर रुग्णवाहिकेतील रुग्ण देखील अपघातात जखमी झाला आहे. सदरची घटना हिंगोली शहरातिलक नांदेड रस्त्यावर दुपारच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाताना या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे. हिंगोली शहरातून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिका व प्रवासी ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. हिंगोली शहरातील नाईक पेट्रोल पंपाच्या पुढे झालेल्या या अपघातात रिक्षामध्ये प्रवास करणारे सहा जण जखमी झाले आहेत. तर रुग्णवाहिकेमधील रुग्णाला देखील इजा झाली आहे, 

महिलेची प्रकृती चिंताजनक 

रुग्णवाहिकेची धडक दिलेल्या रिक्षा प्रवाशांनी भरलेली होती. या अपघातात रिक्षा चालकासह रिक्षातील सर्व प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात जखमी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नांदेड येथे हलवण्यात आले आहे. तर बाकीच्यांवर हिंगोलीतच उपचार सुरु आहेत. 

म्‍हसळा श्रीवर्धन मार्गावर धावत्‍या ट्रेलरला आग 

म्‍हसळ्याकडून श्रीवर्धनच्‍या दिशेने निघालेल्या ट्रेलरने जसवली गावच्‍या उतारावर अचानक पेट घेतला. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्‍याचे सांगितले जात आहे. आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी आगीच्या भडक्यात ट्रेलर जळून खाक झाला आहे. श्रीवर्धन पोलिस व अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. मात्र तो पर्यंत ट्रेलर पूर्णपणे जळला होता. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्‍कळीत झाली होती.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

SCROLL FOR NEXT