Hingoli Accident Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Accident : भीषण अपघात..अनियंत्रित ट्रक पलटी होऊन ८५ शेळ्या ठार; अकोला- हैदराबाद महामार्गावरील दुर्घटना

Hingoli News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या होत्या. या शेळ्या घेऊन हैदराबादकडे विक्रीसाठी नेल्या जात होत्या

संदीप नागरे

हिंगोली : शेळ्यांची वाहतूक करणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला. यात ट्रकमध्ये असलेल्या शेळ्या दाबल्या जाऊन सुमारे ८५ शेळ्या ठार झाल्या आहेत. सदरचा अपघात अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास घडला असून यात एक कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर येथून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या होत्या. या शेळ्या घेऊन हैदराबादकडे विक्रीसाठी नेल्या जात होत्या. दरम्यान मध्यरात्री दोन वाजता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हिंगोलीच्या कनेरगावजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी होऊन भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रकमधील शेळ्या ह्या रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या. यावेळी शेळ्यांच्या अंगावर ट्रक पडल्याने अनेक शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  

एक कोटीच्या जवळपास नुकसान 

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अनेक शेळ्यांना वाचवलं. तर ट्रकमधील चालक व वाहकाला देखील वाचवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेमध्ये व्यापारी व शेतकऱ्याचे तब्बल एक कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT