'हिंगणी धरण' ओव्हरफ्लो; पिकांचं मोठं नुकसान  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

'हिंगणी धरण' ओव्हरफ्लो; पिकांचं मोठं नुकसान

बार्शी तालुक्यातील 30 गावांचा पाणीप्रश्न मिटला

विश्वभूषण लिमये

सोलापूर - चित्रा नक्षत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने सोलापूर Solpaur जिल्ह्यातील बार्शी Barshi तालुक्यातील सर्वात मोठा असलेला हिंगणी Hingani Dam मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. 'हिंगणी धरण' ओव्हरफ्लो Overflow झाल्यामुळे बार्शी तालुक्यातील तब्बल 30 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

हे देखील पहा -

1972 च्या दुष्काळात बांधलेल हिंगणी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने भोगावती नदीला महापूर आला आहे.हिंगणी येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्याने वैराग-मळेगाव वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पिंपरी गावचा संपर्क तुटला आहे.

धरण भरल्याने एकीकडे शेतकरी समाधानी झाला असला तरी शेतातील काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद,कांदा आणि इतर पालेभाज्या,फळ बागांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था 'कही खुशी कही गम' अशी झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ सुरू असल्याने प्रशासनाने भोगावती नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT