Court  Saam Tv
महाराष्ट्र

Wardha: हिंगणघाट प्राध्यापिका जळीत हत्याकांडाचा आज निकाल

निकालामुळे तगडा पोलिस बंदोबस्त, सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा - हिंगणघाट शहरातील प्राध्यापिका जळीत हत्याकांड प्रकरणात आज निकाल लागणार आहे. या प्रकरणाला दोन वर्ष पुर्ण झाले असून पीडितेच्या कुटुंबीयांना दोन वर्ष निकालाची वाट बघावी लागली. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मंदिराकडून न्याय मिळणार असल्याचा विश्वास आहे त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला न्यायालय (Court) काय शिक्षा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्र न्यायाधीश राहुल भागवत यांच्या न्यायालयात अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. यावेळी विधीतज्ञ उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. (Wardha Latest News)

हे देखील पहा -

प्राध्यापिकेच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2022 ला हिंगणघाट जळीत हत्याकांडचा निकाल लागणार आहे हे विशेष. प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाचा अंतिम निकाल आज अकरा वाजता लागणार आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असून आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे अशी माहिती शासकीय अभियोक्ता दीपक वैद्य यांनी सांगितली आहे

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने दारोडा गावात व शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हिंगणघाट पोलिसांकडून तगडा बंदोबस्त गावात व शहरात लावण्यात आला आहे. बंदोबस्ता करिता उपविभागीय पोलीस अधिकारी ,पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई, दंगल पथक व नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार असून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्राध्यापिकावर एक तर्फी प्रेम प्रकरणातून आरोपी विकी उर्फ विकेश नगराळे याने अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 3 फेब्रुवारी 2020 ला नंदोरी चौकात घडली होती. या घटनेत पीडित 90 टक्के भाजली होती. पोलिसांनी तिला तत्काळ नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सात दिवस पीडितेवर उपचार सुरू असताना 10 फेब्रुवारीला पहाटे सहा वाजून 55 मिनिटांनी तिची मृत्यूशी झुंज संपली. पीडितेची मृत्यूची माहिती समजताच कुटुंबियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रोश केला होता. तर मृतदेह गावात आणतांना यावेळी गावात पोलीस व नागरिकांमध्ये चकमक झाली होती. पीडितेच्या अंत्यसंस्कार वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी गावात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT