hinganghat police charged ncp leader atul vandile saam tv
महाराष्ट्र

Wardha NCP : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गटबाजी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांसह सहका-यांवर गुन्हा दाखल

चर्चा करून हा वाद सोडविण्याकरिता समुद्रपूरच्या विद्या विकास चौकात भेटण्याचे एनसीपीच्या पदाधिका-यांचे ठरले. त्यानुसार भेट झाली आणि तेथेच मारहाणीचा प्रकार घडला.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात (hingat vidhansabha constituency) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काॅंग्रेसमध्ये (ncp) दोन गट पडले आहेत. या गटबाजीतून झालेल्या नियुक्तीच्या वादावरून राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी समुद्रपूरच्या माजी शहर अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना समुद्रपूरच्या विद्या विकास चौकात घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी वांदिलेसह सहका-यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एक माजी आमदार राजू तिमांडे व बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांचे तर दुसरा गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादीत आलेले अतुल वांदिले यांचा आहे. या दोन्ही गटात मागील काही महिन्यांपासून अंतर्गत धुसपूस पहावयास मिळत होती. मात्र या धुसपुसीचे रूपांतर आता हाणामारीत व्हायला लागले आहे.

हिंगणघाट येथे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारीला मेळावा घेत काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यानंतर समुद्रपूरचे माजी शहराध्यक्ष मनीष गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना फोन करून आम्हाला विश्वासात न घेता नियुक्त्या कशा केल्या? अशी विचारणा करताच त्यांनी फोन बंद केला.

त्यानंतर प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी मनीष गांधी यांना फोन केला असता दोघांत वाद झाला. चर्चा करून हा वाद सोडविण्याकरिता समुद्रपूरच्या विद्या विकास चौकात भेटण्याचे ठरले. त्यानुसार भेट झाल्यावर रात्री मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार तक्रारीअंती पुढे आला.

प्रदेश सचिव अतुल वांदिलेसह प्रलय तेलंग, प्रवीण श्रीवास्तव, अशोक डगवार आणि अन्य दोघांनी हल्ला करून मारहाण केल्याची तक्रार गांधी यांनी समुद्रपूर पोलिसांत दिल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मनीष गांधी हे दुसऱ्या गटाचे असल्याने या प्रकरणात आता राष्ट्रावादीचे दोन्ही गट समोरासमोर आलेत.

या घटनेनंतर माजी आमदार राजू तिमांडे व सुधीर कोठारी यांनी समुद्रपुरात पत्रकार परिषद घेत वांदिले यांच्यावर कारवाईची मागणी करत या घटनेचा निषेध केला. सोबतच या प्रकरणात पोलिसांनी लावलेल्या कलम या वाढविण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना करणार असल्याच सांगितलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गटबाजीतून झालेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. गांधी यांच्या तक्रारीवरून प्रदेश सचिव अतुल वांदिलेसह प्रलय तेलंग, प्रवीण श्रीवास्तव, अशोक डगवार आणि इतर दोघांवर कलम गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा तपास समुद्रपूर पोलीस करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT