Hindi Language  Saamtv
महाराष्ट्र

Hindi Language: महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती; पहिलीपासून हिंदीच शिका, शिक्षण विभागाचा आदेश

Hindi Language: राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीची केली आणि राज्यात वादाची ठिणगी पडली...मात्र सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे? त्यावर राज ठाकरेंनी काय भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्कर, साम प्रतिनिधी

आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदीही सक्तीची करण्यात आलीय. शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय.त्यावरुन आता राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय. काय आहे हा निर्णय आणि राज ठाकरे का गरजलेत पाहुयात.

राज्यात जूनपासून लागू होणाऱ्या शिक्षण धोरणात भाषासंवर्धानाच्या नावाखाली पहिलापासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलीय. राज्यात आधीच मराठी शाळांची संख्या रोडावतेय. त्यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठीबरोबर हिंदी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत.

राज्य शालेय शिक्षण विभागाने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय.राज ठाकरेंनी हिंदू आहोत हिंदी नाही म्हणत थेट विरोध केलाय. आणि 'एक्स'वर पोस्ट करून राज्य सरकारला जाब विचारलाय.

हिंदू आहोत हिंदी नाही

महाराष्ट्रात 'हिंदी' पहिलीपासून का शिकायची?

दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचे कारण काय?

महाराष्ट्राचे 'हिंदीकरण' कशासाठी?

महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का?

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय.

भाषा संवर्धनाच्या नावाखाली नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत. भाषा सक्तीची केल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा अतिरिक्त बोजा निर्माण होणार नाही का? महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करताना इतर राज्यात मराठी भाषा शिकवणार का? हिंदीसह इतर भाषांचा पर्याय का देण्यात आला नाही? या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर शालेय शिक्षण विभाग देईल का? की भविष्यातली काही राजकीय गणितं जुळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात हिंदी लादली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT