accident news  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Gadchiroli: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Gadchiroli tractor accident: गडचिरोलीतील आलापल्ली-भामरागड महामार्गावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गणेश शिंगाडे

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

५६ वर्षीय कुम्मा महारु पुंगाटी आणि ४८ वर्षीय मिडको कुम्मा पुंगाटी अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत. तर आशिष चंदू महाका (वय १७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत.

आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने आपल्या गावाकडे परतत होते. त्यावेळी त्यांचा नातेवाईक असलेला आशिष महाका यालाही त्यांनी लिफ्ट दिली होती. तिघेही तलवाडा परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की कुम्मा पुंगाटी आणि मिडको पुंगाटी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरमध्ये हलवण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्याच्यावर लक्ष ठेवलं जातंय.

या अपघाताची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रॅक्टर चालकाचा वेग किती होता आणि निष्काळजीपणा झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे येत असताना लागली आग

भरधाव वेगात असलेली महामंडळची इलेक्ट्रिक बस जळून खाक झाल्याची घटना चंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील घंटा चौकीजवळ घडली. गडचिरोलीवरून चंद्रपूरला प्रवासी घेऊन येत असता अचानक बसला आग लागली. बसमधील प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये ४३ प्रवासी प्रवास करीत होते. सर्व प्रवासी व चालक सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलवण्यात आलं. बसला आग लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fenugreek water: बडीशेप की मेथी? डिटॉक्स आणि वजन कमी करण्यासाठी कोणतं पाणी प्यावं?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा कडकडीत बंद

स्वप्नपूर्ती! १७ सप्टेंबरला बीडकरांना मिळणार सर्वात मोठे गिफ्ट; पुण्यासाठी सुटणार पहिली ट्रेन, 'या' तारखेला मुंबई जोडणार

बेकरीवरील कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची मागणी; लाच घेताना मुंबई महापालिकेच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; तुमच्या शहरातील पावसाचा अंदाज काय? वाचा

SCROLL FOR NEXT