uday samant statement on Jitendra awhad saam tv
महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांना अटक, उदय सामंतांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, तरुणाला ज्या पद्धतीने मारहाण झाली...

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला, कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं. या चित्रपटात दाखवलेला इतिहास चूकीचा असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्या नेतृत्वातही ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली.

आव्हाडांना अटक केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मॉलमध्ये जो प्रकार घडला, तरुणाला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असं सामंतांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. (uday samant reaction after ncp leader jitendra awhad arrest)

उदय सामंत काय म्हणाले?

मॉलमध्ये जो प्रकार घडला, तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कायदेशीर कारवाई आहे, यावर बोलणं योग्य नाही. कोणी मारहाण केली, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे वर्तन करू नये. तरूणाला मारहाण झाल्यानंतर पोलिसांना जे योग्य वाटले, त्यानुसार गुन्हा दाखल झाला. कायदा आणि सुव्यवस्था कुणीही बिघडवू नये. पोलिसांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये या चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रेक्षकांशी हुज्जत घातली. याचदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT