Dhule News Saam Tv
महाराष्ट्र

साक्री तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश

साक्री शहरातील मुख्य आणि मोठा पुल हा देखील पाण्याखाली जाण्याची भीती

भूषण अहिरे

धुळे - साक्री तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर शहरातून वाहणाऱ्या पांझरा व कान या दोन्ही नद्यांना महापूर आल्याने प्रशासनातर्फे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, नदीला आलेल्या पुराचे पाणी आणखीनच वाढत असल्यामुळे साक्री (Sakri) शहरातील मोठा पूल देखील जवळपास पाण्याखाली जाण्याची शक्यता असून पूला जवळील अमरधाम पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले असून पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या घरांमधील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

हे देखील पाहा -

नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, त्याचबरोबर नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे पाणी हळूहळू वाढू लागले आहे, आणि साक्री शहरातील मोठा पूल हा पाण्याखाली जाण्याची भीती असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे धुळ्याहून साक्री मार्गे होणारी वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

साक्री शहरातील दोन पुल यापूर्वीच पाण्याखाली गेले असून आता साक्री शहरातील मुख्य आणि मोठा पुल हा देखील पाण्याखाली जाण्याची भीती आहे, आणि त्यामुळे नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला नागरिक अडकले

साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे आणि पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्यामुळे सकाळपासून नागरिक पुलाच्या दुसरा बाजूला अडकले आहेत. दहिवेल येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास वीस गावांचा संपर्क तुटला आहे.

ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे, जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही, तोपर्यंत या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूलाच पुराचे पाणी कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT