फोटो काढून बाईट देण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा; पंकजा मुंडेंचा सल्ला  विनोद जिरे
महाराष्ट्र

फोटो काढून बाईट देण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा; पंकजा मुंडेंचा सल्ला

परळीत पूरग्रस्तांसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडेंची मदतफेरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - पश्चिम महाराष्ट्रासह Maharashtra कोकणात Kokan निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे येथील नागरिकांना एक ना संकटाचा सामना करावा लागत आहेत. यामुळे पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी, आज परळीत मदतफेरी काढली होती.

हे देखील पहा -

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की परळीकरांनी नेहमी मला भरभरून प्रेम दिले आहे. आजही त्यांनी भरभरून मदत केली आहे. एकीकडे राजकारणात जातीयतेचा रंग असताना, दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातीपाती विसरून, जातीपाती धर्माच्या पलीकडे नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत. प्रत्येकांनी तिथे जाऊन फोटो काढून बाईट देण्यापेक्षा अशी मदत करावी असा सल्ला देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण ,महाड आदी भागात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हजारो लोक बेघर झाले असून जिवित व मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

अशा संकटात लोकांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. त्यामुळं आज पंकजा मुंडे स्वतःहा परळीतील रस्त्यावर येत, शहरातील स्टेशन रोड, टाॅवर मार्गे गणेशपार पर्यंत मदतफेरी काढली.

Edited BY - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT