Yavatmal RTO saam tv
महाराष्ट्र

Yavatmal RTO News: हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा ! यवतमाळात RTO उतरलं रस्त्यावर, दाेन लाखांचा दंड वसूल

Helmet Compulsion In Yavatmal: नागरिकांना वाहन चालविताना हेल्मेट परिधान करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात आज पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट (helmet) सक्ती लागू करण्यात आली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणा-या सुमारे २९० नागरिकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे वाहन चालकांना हेल्मेट परिधान करुनच वाहन चालवावे लागणार असल्याचे चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात २०२२ या वर्षात ६६२ वाहनांचे अपघात घडले. यात मृत्यूमुखी ४२६ तर ५८६ गंभीररित्या जखमी झाले. जखमीपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर तसेच त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो. त्यांची हानी होते. ती कधीच भरुन निघणारी नसते.

वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ७० टक्के अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आजपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू केल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी साम टीव्हीला दिली.

दरम्यान आज पहाटेपासून यवतमाळ जिल्ह्यात हेल्मेट परिधान करुन वाहन चालविण्याच्या आदेशाचे काटेकाेर अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. पहाटेपासून २९० वाहनधारकांवर आदेशाचे उल्लंघन केल्याने (rto) कारवाई करण्यात आली आहे.

त्यातून दोन लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उप प्रादेशिक परिवहन विभागाचे निरिक्षक संदीप मुखे यांनी नागरिकांनी हेल्मेट परिधान करुन वाहन चालवावे असे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT