Satara Rain Saam Tv
महाराष्ट्र

साताऱ्यात मुसळधार पाऊस; प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली

किल्ले प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली

ओंकार कदम

सातारा : जून महिन्यात पाठ फिरवणाऱ्या पावसाने (Rain) जुलै महिन्यात चांगलीच धांदल उडवली आहे. राज्यातील विविध भागात सतत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच किल्ले प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली असल्याची माहिती आहे. (Satara Rain Updates)

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश पूल पाण्याखाली गेले आहे. महाबळेश्वर तालुका, पाटण तालुक्यात तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. दरम्यान, किल्ले प्रतापगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती आहे. दरड कोसळल्यामुळे किल्ल्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा दरड कोसळली असल्यामुळे अद्याप प्रशासनाकडून कोणी पोहचू शकले नाही. (Satara Rain News)

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण क्षेत्रात कालपासून पावाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी वाढण्यास सुरवात झाली आहे. गेल्या 24 तासात धरणातील पाणी साठ्यामध्ये जवळपास 2 टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 17.83 टीएमसीवर पोहचला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT