Heavy Rain Saam Digital
महाराष्ट्र

Heavy Rain : पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला अवकाळीचा तडाखा; कोणत्या जिल्ह्यात काय आहे स्थिती? जाणून घ्या

Sandeep Gawade

हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरवत आज अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला अक्षरश: झोडपून काढल. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला पहायला मिळाल. वीड अंगावर पडून एका ८ वर्षांच्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मका आणि काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि प्राण्यांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं पहायला मिळालं.

संभाजीनगरमध्ये झाडे उन्मळून पडली, झाडाखाली पाच जण अडकले होते

शहरातील विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात सिडको एन-३, शहानुरवाडी, बीड बायपास, मयूरबन कॉलनी उस्मानपुरा आणि पंचवटी या भागांचा समावेश आहे. पंचवटी येथे झाड कोसडल्याने त्याच्याखाली चार ते पाच जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे, अशी माहिती संबंधित विभागातर्फे प्राप्त झाली आहे.

अंगावर वीज पडून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापुरात नदीनाल्यांना पाणी

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पाणी आली आहे. नाल्याला अचानक पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव -गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पुणे जिल्ह्यातील पिकांचं नुकसान

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात अवकाळी पावसामुळे काही ठिकाणा फटका बसला आहे तर काही ठिकाणच्या पिकांना याचा फायदा होणा आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दक्षिण रायगडला झोडपलं

दक्षिण रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, तर दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं आहे.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा,नळदुर्ग,तुळजापूर,धाराशिव व कळंब,परंडा परिसरात पावराची जोरदार बॅटींग सुरू आहे. या फळबागांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात आज झालेल्या गारपिटीने निलंगा, औसा, रेनापूर, लातूर या भागातील आंबा फळबागांना मोठा फटका आहे. जिल्ह्यातल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT