nashik , sinnar saam tv
महाराष्ट्र

पावसानं उडवली दाणदाण, लाखाे रुपयांचं नुकसान; मदतीसाठी सिन्नरकरांनी राेखला नाशिक पुणे महामार्ग (पाहा व्हिडिओ)

पूरपरिस्थितीमुळे शेतकरी वर्ग देखील हवालदिल झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री तसेच गुरुवारी मुसळधार पाऊस (rain) झाला. या पावसामुळं गोदावरीचं पात्र भरुन वाहू लागलं हाेते. सिन्नर (sinnar) तालुक्यात देखील माेठा पाऊस झाला. त्यामुळं येथील शेतीचे माेठं नुकसान झालं आहे. रस्त्यांवरील पाण्यामुळे सर्वत्र गाठ आणि चिखल साठला आहे.

सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पुराचं पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं पूर्णपणे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांसह शेत जमीन वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी बंधारे तुडुंब भरल्याने बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरलं आहे. शासनाने आम्हांला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसामुळे आलेल्या पूरामुळं सिन्नर शहरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे व्यावसायिक हतबल झाले हाेते. एका स्टेशनरी दुकानदरानं दुकानामधील सर्व वह्या, पुस्तके तसेच कागद भिजले असं सांगितलं. संबंधित दुकानदाराने पाच लाख रुपयांचे नुकासन झाल्याचे सांगितलं. अन्य एका दुकानदारानं दुकानात पाणी शिरल्यानं 99 टक्के माल भिजल्यानं हजाराे रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT