Nandurbar Rain News : गेल्या आठवड्याभरापासून राज्याच्या विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील काही धरणे १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे राज्यातील काही भागातील नागरिकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. २४ तासापासून संततधार पाऊस सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. नंदुरबारकरांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांजवळील भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतांमध्ये पुराचे पाणी आल्याने पीक पाण्याखाली आले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना जोडणाऱ्या लहान फरशी पुलावरून पाणी जात असल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे तुफान पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेती कामांना ब्रेक लागला आहे. नैदणी, कोळपणी, औषध फवारणी, पिकांना खत देणे इत्यादी कामे खोळंबल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. संततधार पावसामुळे धरणे व नदी नाल्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी अति प्रमाणात झालेल्या पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.