Devendra Fadnavis , Gadchiroli, Rain Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : वाढदिवसाच्या दिनीच देवेंद्र फडणवीसांना करावा लागला गडचिरोलीचा दाैरा रद्द; जाणून घ्या कारण

Devendra Fadnavis Latest News : गडचिराेली जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli Rain Updates : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचा गडचिरोलीचा दाैरा रद्द झाला आहे. फडणवीस हे अहेरी येथील दौ-यावर हाेणार येते. दरम्यान गडचिराेली जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती (gadchiroli floods) निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरसरी 56 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

आज (शनिवार) सकाळी पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 13 मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यामध्ये सर्वाधिक पाऊस चामोर्शी 189 मिलीमीटर, अहेरी 154, पेरमिली मंडळात 119 मिलीमीटर पाऊस झाला.

जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या (rain) पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीच्या अहेरी येथील दौराही रद्द करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT