Heat Wave Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Heat Wave Maharashtra: अवकाळीनंतर उकाड्यामुळे बळीराजा संकटात; उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

Chickens Died Due To Heatstroke In Sangli: राज्यात उष्णतेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. आता उष्माघातामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

पावसाळा तोंडावर आलाय परंतु उष्णता काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. उकाड्यामुळे सगळेच हैराण झाले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास जाणवत आहे. या उष्माघाताच्या झळा आता बळीराजाला बसत आहत. कारण उष्माघातामुळे जनावरं, पक्षी यांचा देखील मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. सांगलीत उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील (Heat Wave Maharashtra) पलूस तालुक्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांचं पॉल्ट्री फार्म आहे. त्यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण ४२०० पक्ष्यांपैकी १२०० कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अगोदरच अवकाळीमुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता जोडधंद्याला देखील उष्णतेचे ग्रहण लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळाल्याची स्थिती झाली (Chickens Died Due To Heatstroke) आहे.

आता वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आल्याचं चित्र आहे. मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झालं. त्यामुळे उष्णतेचं प्रमाण (Heatstroke) वाढलं आणि अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेडधारकांचे धाबे दणाणले आहेत. कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे.

शेतकरी शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशु आणि कुक्कुटपालन करतात. अवेळी पडणारा पाऊस, वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला (Sangli News) आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांला बसत आहे. यापूर्वी देखील उष्मघातामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता वाढत्या उन्हाचा परिणाम पोल्ट्रीफार्मवर होत आहे. कोंबड्यांच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

SCROLL FOR NEXT