मुलांच्या भवितव्यासाठीच आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या - सतेज पाटलांचा दावा विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

मुलांच्या भवितव्यासाठीच आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या - सतेज पाटलांचा दावा

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे मागच्या वेळेस सोमय्यांना बंदी घातली- सतेज पाटील

विश्वभूषण लिमये

सोलापूर - काल आरोग्य विभागाच्या परीक्षा Heath Department Exam अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यावर बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील Satej Patil म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणं हे महाकष्टाचं काम असतं, लाखो विद्यार्थी जेंव्हा परीक्षेला बसतात तेंव्हा परीक्षा पारदर्शकपणे होणं गरजेचं असतं. एखादा तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असता आणि परीक्षा झाली असती तर प्रचंड गोंधळ झाला असता, त्यामुळे तुमच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकलेला आहे.

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, यापुढे जी परीक्षा घेण्यात येईल त्यातून तांत्रिक मुद्दे निघून जातील याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे राबवली जाणारी ही पहिलीच भरती प्रक्रियेची परीक्षा आहे आणि ही परीक्षा परदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे.

दरम्यान,भाजपचे माजी खासदार यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे बंदी घालण्यात आली होती. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सांगितलेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यासाठी आता बंदी नाही आहे. त्यांची कुठेही अडवणूक केली जाणार नाही. मागच्या वेळेस त्यांचा डिटेल दौरा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला नव्हता, त्यामुळे तेंव्हा तसा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती सतेज पाटील यांनी सोलापूरात दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT