Viral Video
Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: तो चालत्या ट्रेन समोर आला आणि फ्लाइंग किस करू लागला ; अन्... क्षणात बदललं सारं चित्र

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: सोशल मीडियावर रोजच अतरंगी व्हिडिओ पाहायला मिळतात. यातले अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतात. रेल्वे प्रवासाच्या काही व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून जोरदार व्हायरल होत आहेत. यात काही महिलांचे भांडणाचे आणि हाणामारीचे व्हिडिओ समोर आलेत तर रेल्वे अपघातात चमत्कारीकरित्या बचावलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र आजचा व्हिडिओ या सगळ्यांपेक्षा फारच निराळा आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट दुखे पर्यंत नक्की हसाल. (Latest Marathi Viral video News)

एक ट्रेन रुळांवर येत असताना एक व्यक्ती ट्रेनच्या दिशेने जात आहे. कोणीतरी ट्रेनसमोर आलं आहे हे पाहून मोटरमन ट्रेनचा हॉर्न वाजवतो. मात्र तरी देखील तो माणूस तेथून बाजूला होत नाही. त्याला जीव द्यायचा असावा असे काहींना वाटते. मात्र तसेही नसते. ट्रेनचा वेग कमी असल्याने तो ट्रेनच्या दिशेन हसत हसत पुढे जातो. त्यानंतर तो जे करतो आणि त्यावर मोटरमनची प्रतिक्रिया खरोखर हस्यास्पद आहे.

ट्रेन आपल्या जवळ येत आहे हे पाहून तो माणूस चक्क ट्रेनला फ्लाइंग कीस देतो. तसेच ट्रेन अगदी जवळ आल्यावर तो रेल्वे रुळावरून बाजूला होतो. ट्रेनचा वेग कमी असला तरी तीतकासा कमी नव्हता त्यात त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता होती. त्यामुळे तो बाजूला होईपर्यंत मोटरमनने रेल्वे थांबवलेली असते. त्याने केलेले फ्लाइंग कीस पाहून मोटरमन खूप चिढतो. तो खाली उतरून त्या व्यक्तीला बेदम मारहाण करतो.

सदर व्यक्तीने ही करामत दारूच्या नशेत केली आहे. दारू जास्त झाल्याने आपण काय करतोय याचे त्याला काहीच भान नव्हते. त्यामुळे तो अशा प्रकारे ट्रेन समोर आला होता. यात मोटरमन त्याला खूप मारतो. लाथा बुक्यांनी मारत त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना एका मुलाने त्याच्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड केली आहे. तसेच नरेंद्र सिंग या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. बेवड्या माणसाने केलेली करामत पाहून नेकटरी हसण्याचे इमोजी शेअर करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

SCROLL FOR NEXT