Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना अटक होणार? मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी घेतली कोर्टात धाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे

साम टिव्ही ब्युरो

Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. मुश्रीफ यांना राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना धमक्या सुद्धा देण्यात येत आहे, असा उल्लेख या जामीन अर्जात करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले होते.  (Latest Marathi News)

गेल्या २१ दिवसांत ईडीने मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी केली होती. सुरूवातीला त्यांचे कोल्हापुरातील निवासस्थान, त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. (Maharashtra Political News)

११ जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती.

या छापेमारीनंतर २१ दिवसांनी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती.

यावेळी तब्बल ३० तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. दरम्यान, यानंतर ईडीने आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ३५ कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मात्र, आता मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जातून राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अर्जावर आता १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT