Hasan Mushrif Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif On Bandatatya Karadkar: अजितदादा आणि सुप्रियाताईंनी कधीही मद्याच्या थेंबाला हात लावला नाही - हसन मुश्रीफ

पवार घराण्याची बदनामी करणाऱ्यांच्या प्रयत्नाला बंडातात्या कराडकर यांनी बळी पडू नये.

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर: सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयावरुन विरोधकांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. तर, कीर्तनकार बंडातात्या कराडकरांची (Bandatatya Karadkar) या निर्णयावर टीका करताना जीभ घसरली. त्यांनी राज्यातील महिला नेत्यांबाबद वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला. पवार घराण्याची बदनामी करणाऱ्यांच्या प्रयत्नाला बंडातात्या कराडकर यांनी बळी पडू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. (Hasan Mushrif reaction on Bandatatya Karadkars statement).

अजितदादा आणि सुप्रियाताईंनी कधीही मद्याच्या थेंबाला हात लावला नाही - हसन मुश्रीफ

अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया युळे (Supriya Sule) यांनी कधीही मद्याच्या थेंबाला हात लावला नाही. पवार घराण्याची बदनामी करणाऱ्यांच्या प्रयत्नाला बंडातात्या कराडकर यांनी बळी पडू नये. बंडातात्या कराडकर यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सहभागातून सरकार उत्तम प्रकारे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यातील महिला नेत्या (leaders) मद्य प्राशन करतात असं वक्तव्य बंडातात्या कराडकरांनी केले होते. या आंदोलनात बंडातात्यांनी पोलिसांवर (police) देखील मास्कवरुन टीका केली होती. गुरुवारी रात्री उशिरा बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल झाला होता.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT