Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Independence Day Wishes: देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार

Independence Day 2023: देशाला मिळालेले स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar: देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक, सेवापदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाच्या अधिकारी आणि जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.(Latest Marathi News)

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, देशाला मिळालेले स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या 76 वर्षात भारतमातेच्या अनेक सुपत्रांनी बलिदान दिले.

या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर 76 वर्षांच्या वाटचालीत, देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकिल, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे.

या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानाने उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून, सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढनिर्धार करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT