Rescue teams and local authorities conduct urgent operations after the collapse of a Hanuman temple mandap in Yashwadi, Parbhani. saam tv
महाराष्ट्र

Parbhani : परभणीत मंदिरात सभामंडप कोसळला; ३०-४० भाविक दबल्याची माहिती

Yashwadi Temple Mandap Collapse Manwat Parbhani News: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात यशवाडी येथे हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळल्याने 30 ते 40 भाविक मलब्याखाली अडकले. प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य सुरू असून पोलीस आणि आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहेत.

Omkar Sonawane

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणीच्या मानवत तालुक्यात प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला. त्याखाली ३० ते ४० जण दबल्याची माहिती समजते. प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात आज, शनिवारी भीषण दुर्घटना घडली. तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला. त्याखाली अंदाजे ३० ते ४० भाविक दबल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले आहे.

या घटनेनंतर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. मानवत तालुक्यातील यशवाडीमध्ये प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. शनिवार असल्यानं या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्याचवेळी मंदिरातील सभामंडप कोसळले. ढिगाऱ्याखाली ३० ते ४० भाविक दबले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT