hanuman jayanti utsav sohala in anjaneri nashik  Saam Digital
महाराष्ट्र

Hanuman Jayanti 2024 : अंजनीपुत्र हनुमान की जय..., शेकडाे भाविकांच्या घोषणांनी दुमदुमली अंजनेरी

Hanuman Jayanti Sohala Marathi News : अंजनेरी प्रमाणेच राज्यातील सर्वच हनुमान मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मारुतरायांच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे.

अभिजीत सोनावणे

Anjaneri News :

रामभक्त हनुमानाचं जन्मस्थान असलेल्या नाशिकजवळच्या अंजनेरीमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धहनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मारूतीरायाच्या दर्शनसाठी गर्दी झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. आज हनुमान जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. हनुमानाच्या मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे.

पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन ६ वाजून १५ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा इथे पार पडला. त्यानंतर मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. जय हनुमान, रामभक्त हनुमानकी जयच्या जयघोषाने पहाटेपासून मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे. (Maharashtra News)

अंजनेरी प्रमाणेच राज्यातील सर्वच हनुमान मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मारुतरायांच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT