hamid dabholkar  
महाराष्ट्र

सरकारला नियम करायला वेळ कूठंय? डाॅ. हमीद दाभाेलकरांची खंत

ओंकार कदम

सातारा : सुरुर येथे मुलीच्या मांडीवर काेंबडा ठेऊन पूजाअर्चा चालल्याची घटना समाेर आली आहे. युवकांच्या जागरुकतेने तेथे सुरु असलेला प्रकार तातडीने थांबला. दरम्यान घटनेवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक डाॅ. हमीद दाभाेलकर hamid dabholkar यांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना चिंतेचीबाब असल्याचे त्यांनी नमूद केले. hamid-dabholkar-anti-superstition-and-black-magic-act-wai-satara-marathi-news-sml80

ते म्हणाले खूप अस्वस्थ करणारी ही घटना आहे. एक लहान मुलगी कदाचित तिला रुग्णालयाच्या उपचारांची गरज आहे परंतु तिच्यावर अघाेरी उपचार केले जात आहेत असे दिसून येते. तिला प्रत्यक्षात डाॅक्टरची मदत देण्या एेवजी नरबळीची तयारी नाही ना अशी मनात पाल चुकचुकत आहे. मेळघाटात पश्चिम महाराष्ट्रात ते देखील वाईत अशा प्रकारच्या घटना घडताहेत ही खूप गंभीर बाब आहे.

काही तरुण मुलांनी जागरुकता दाखविल्याने यामध्ये हस्तक्षेप झाला ही उत्तम बाब आहे. धावजी पाटील मंदिराबाबत यापुर्वी अंनिसने तक्रारी दाखल केल्या हाेत्या. त्यानंतर ते मंदिर बंद करण्यात आले. या व्हिडिआेत त्यात संदर्भातले काही बाेलणे त्याच अनुषंगाने वाटत आहे. ज्या ठिकाणी अशा घटना घडतातहेत तेथे पाेलिसांनी लक्ष ठेवून कार्यवाही केली पाहिजे.

जादुटाेणा विराेधी कायद्याचे नियम करण्यासाठी गेल्या आठ वर्षांत काेणत्याच सरकारला वेळ मिळालेला नाही. जालन्यात देखील अशी घटना घडल्याचे समाेर आले आहे. कायद्याचा धाक भाेंदूबाबांना वाटावा यासाठी शासनाने जादुटाेणा विराेधी कायद्याचे कडक नियम केले पाहिजेत असेही डाॅ. हमीद दाभाेलकरांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT