अक्कलकोट सलग दुसऱ्या वर्षी भक्तांविना गुरुपौर्णिमा संपन्न!  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये सलग दुसऱ्या वर्षी भक्तांविना गुरुपौर्णिमा संपन्न!

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात सलग दुसऱ्या वर्षी गुरु-शिष्य भेटीची परंपरा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. भक्तांविना वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा संपन्न झाली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : श्री स्वामी समर्थांनाच गुरु मानणारे असंख्य स्वामी भक्त देशभरात असल्याने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्रीगुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दि.२५ मार्च रोजी स्वामींचे वटवृक्ष मंदीर पुन्हा बंद करण्यात आले होते. ते आज तागायत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत.

कोरोना पार्श्वभुमीवर आज वटवृक्ष मंदिरातील श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने भाविकांविना साजरा करण्यात आला. गुरूपौर्णिमेनिमित्त आज पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडली. सकाळी ११ वाजता गुरुपौर्णिमेची महानैवेद्य आरती मंदिर पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी कोणत्याही भाविकांना थेट आरती दरम्यान सहभागी होता आले नाही. आरतीनंतर मंदीर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वार त्वरित बंद करण्यात आले. स्वामी भक्तांनी देखील गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT