Satara News, Sharad Pawar, Udayanraje Bhosale, Shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara News : 'कुटुंब विभक्त करण्याची शरद पवारांना सवय,साताऱ्यातही तेच केलं'

एसटी को.ऑप. बँक आहे ती पुन्हा सामान्य लोकांच्या हाती देण्यासाठी मी साताऱ्यात आलो असे सदावर्तेंनी म्हटलं.

ओंकार कदम

Gunratna Sadavarte News : शरद पवार यांची कुटुंब कुटुंब विभक्त करण्याची सवय आहे. साताऱ्यात सुद्धा त्याचा वापर त्यांनी केला (राजघराणे) तसाच प्रयत्न कष्टक-यांमध्ये सुद्धा त्यांनी केला असा गंभीर आराेप गुणरत्न सदावर्ते यांनी आज (बुधवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज गुणरत्न सदावर्ते हे साताऱ्यात (Gunratna Sadavarte In Satara) आले होते. त्यावेळी सदावर्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Maharashtra News)

सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. या व्हायरसचा स्प्रेड थांबला पाहिजे आणि निर्जंतकीकरण झालं पाहिजे. म्हणून मी या सभा घेत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

एस टी को.ऑप. बँक आहे ती पुन्हा सामान्य लोकांच्या हाती देण्यासाठी मी साताऱ्यात आलो आहे असे सांगत सदावर्ते म्हणाले वेगळा मराठवाडा मागणीवर मी ठाम आहे. छोटी राज्य निर्मिती मधून अंतर्गत विकास आहे ही संविधनिक मागणी आहे. या आधी सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा वेगळा होण्याच्या मागण्या झाल्या होत्या आणि त्यात काही गैर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी विलनिकरणाची भूमिका कायम

एसटी विलीनीकरण चर्चेची खोटी सुरवात शरद पवारांनी केली. शरद पवार यांची कुटुंब कुटुंब विभक्त करण्याची सवय आहे. साताऱ्यात सुद्धा त्याचा वापर त्यांनी केला (राजघराणे) तसचं प्रयत्न कष्टकार्यांमध्ये सुद्धा त्यांनी केला असेही सदावर्ते यांनी नमूद केले.

नथुराम गोडसेंच्या विचारांना चुकीच्या पद्धतीने मांडल गेलं. नुसत तेव्हढ नाही तर त्यांच्याबरोबर फेअर ट्रायल झाली नाही असे सदावर्तेंनी म्हटलं.

महाराष्ट्रात सर्व वर्गात मगासलेपणा आहे. त्यासाठी ews ची तरतूद आहे. शरद पवारांनी या बाबत राजकारण केलं. ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या या लिंबू टिंबु पॉलिटिक्सचा भाग होता. त्यामुळे मराठा समाजातील लोकांना एकत्र आणून आरक्षण या विषयावर चर्चा करणार असल्याचे सदावर्तेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT