Gunratan Sadavarte Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Gunratan Sadavarte : खंडाळा घाटात माझा एन्काऊंटर करणार होते; संघाच्या डॉक्टरांमुळे वाचलो, सदावर्तेंचा खळबळजनक दावा

Gunratan Sadavarte Latest News : बिग बॉसच्या घरात बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

Satish Daud

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सदावर्ते यांनी आता थेट बिग बॉसच्या १८ व्या पर्वात सहभाग घेतला आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान, बिग बॉसच्या घरात बोलताना सदावर्ते यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. पुण्यातील खंडाळा घाटात महाविकास आघाडीकडून माझा एन्काऊंटर करण्याचा प्लान होता, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. जेलमध्ये असताना संघाच्या डॉक्टरने माझे प्राण वाचवल्याचंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपणच ६ महिने मेहनत घेतली, त्यानंतर शिंदे-भाजप सरकार सत्तेत आलं, असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे. बिग बॉसच्या घरात येण्याआधी मला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून धमकीचे फोन आले होते, असा दावाही सदावर्ते यांनी केला. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी करताच खळबळजनक दावे आणि खुलासे करताच बिग बॉसच्या घरातील सदस्यही अवाक झाले.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत चर्चा करताना सदावर्ते म्हणाले, "कधी कधी आपल्या आयुष्यात अनेक दु:खद प्रसंग येतात. काल परवाचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा बिग बॉससाठी मला बोलावलं गेलं, तेव्हा बरोबर साडेआठ वाजेच्या सुमारास मला पाकिस्तानच्या कराची येथून एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली".

यावेळी सदावर्ते यांनी अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम याचं देखील नाव घेतलं. पण यातील काही शब्द हे ऑनस्क्रीन म्यूट करण्यात आले आहेत. याशिवाय सदावर्ते यांनी तुरुंगात असताना घडलेली एक घटना देखील सांगितली आहे. "जेव्हा मी जेलमध्ये होतो, तेव्हा जामीन मला जामीन मिळाला नाही. तरीही काही पोलीस अधिकारी मला घ्यायला आले होते. त्यावेळी माझी तब्येत खराब होती. जेलमध्ये संघाचा डॉक्टर होता. मी त्यांना म्हटलं की, मला सलाईन लावून ठेवा. चार वाजेपर्यंत मला सोडू नका"

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, "त्याठिकाणी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होता, तो मला म्हणाला की, तुला जीवदान मिळालंय. त्यावर मी त्याला कसं? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, इथून पोलिसांनी जर तुझा ताबा घेतला असता. तर तुला खंडाळा घाटात संपवलं असतं. मी, कंगना आणि अर्नब गोस्वामी यांनी खूप स्ट्रगल केलं आहे", असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT