Sanjay Raut SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News : “धनुष्यबाणासाठी २ हजार कोटींचा सौदा”; राऊतांच्या दाव्याची गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली

खासदार संजय राऊत यांची मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडवली खिल्ली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- नवनीत तापडिया

Aurangabad : धनुष्यबाण (dhanushyabaan) आणि शिवसेना (shivsena) खरेदीसाठी दाेन हजार कोटी रुपयांची डील झाली असा गौप्यस्फोट संजय राऊत (sanjay raut) यांनी केला होता. यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. झालं ना आता सगळं, संजय राऊत यांनाच विचारा डिल झालेले पैसे कुठे ठेवलेत, नोटा किती होत्या असा निशाणा गुलाबराव पाटील यांनी साधला आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज औरंगाबाद (aurangabad) विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्ररी आहेत त्या ऐकून निकाली काढण्यात येतील. तसेच जे काम करत नसतील त्यांना सुट्टी देण्यात येईल असा इशारा मंत्री पाटील यांनी कामचुकार कर्मचारी आणि अधिकारी यांना दिला.

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले संजय राऊतांनाच विचारा डिल झालेले पैसे कुठ ठेवले. धनुष्यबाणाची डील दाेन हजार कोटींची झाल्याचा आराेप करणारे संजय राऊत हे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असं विचारल्यावर मंत्री पाटील यांनी जाऊ द्या असे म्हणत राऊतांची खिल्ली उडविली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : संतापजनक! घरात घुसून तरुणीवर दोन वेळा बलात्कार; कुटुंबाला संपवण्याची धमकी

Maharashtra Live News Update: पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग

Akshay Kumar: अक्षय कुमारचा १ फोटो काढायला पापाराझींना मिळतात 'इतके' रुपये; अभिनेत्यानेच सांगितला आकडा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; चौघांचा जागीच मृत्यू

LPG Shortage: टंचाई नाही मग रांगा का? सिलिंडरच्या टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा भडका

SCROLL FOR NEXT