grishma kulkarni , nashik saam tv
महाराष्ट्र

आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेली ४ वर्षांची चिमुकली, शाॅक लागला अन्...; दुर्दैवी घटनेनं हळहळ

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Cidco : नाशिक येथील सिडकोमधील त्रिमूर्ती चौक उंटवाडी रोड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका चार वर्षीय मुलीचा एका दुकानात आईस्क्रीम (ice cream) खाण्यासाठी गेली असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबास जबरदस्त धक्का बसला आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : सिडकोमधील त्रिमूर्ती चौक उंटवाडी रोड येथे विशाल कुलकर्णी हे आपल्या चार वर्षीय ग्रीष्मासह त्यांच्या घराजवळील असलेल्या एका दुकानात रात्री नऊच्या सुमारास गेले. तेथे ते आईस्क्रीम खाण्यासाठी गेले असता ग्रीष्माला फ्रिजच्या वायरचा शॉक लागून ती खाली बेशुद्ध पडली.

यामुळे ग्रीष्माचे वडील विशाल हे घाबरले. त्यांनी तातडीनं तिला उचलून नेत औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. त्यामुळे विशाल कुलकर्णी यांना माेठा धक्का बसला.

ग्रीष्मा अवघी चार वर्षाची हाेती. तिच्या मृत्यूमुळं कुलकर्णी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. ग्रीष्माच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT