Solapur Accident  Saam TV
महाराष्ट्र

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू, संतप्त जमावाचा RTO अधिकाऱ्यांना बेदम चोप

शेतकरी मोहन आदमाने हे त्यांच्या दोन चाकी गाडीवरून मोहोळवरून लांबोटीच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे वेगवान कंटेनर होता.

विश्वभुषण लिमये

सोलापूर: सोलापुरातील (Solapur) मोहोळजवळ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात द्राक्ष बागायतदाराचा मृत्यू झाला आहे. मोहन दत्तात्रय आदमाने असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपातून संतप्त जमावाने आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. ज्यामध्ये आरटीओच्या वायुवेग पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी सोनटक्के, पोलीस निरीक्षक राजेश अहुजा, आणि चालक शिवाजी गायकवाड हे तिघे जखमी झाले आहेत. शेतकरी मोहन आदमाने हे त्यांच्या दोन चाकी गाडीवरून मोहोळवरून लांबोटीच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे वेगवान कंटेनर होता.

वडवळ कोळेगाव नजीक आले असता त्या कंटेनरला थांबवण्यासाठी मागून आरटीओची गाडी आली. आरटीओची गाडी थेट कंटेनरच्या समोर आडवी लावल्याने कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लागावल्याने मोहन आदमाने हे कंटेनरला धडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असं आरोप आदमाने यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केला जातोय. संतप्त जमावाने यावेळी आरटीओची गाडी फोडली तसेच आरटीओच्या अधिकाऱ्यांना देखील बेदम मारहाण केली आहे. जमावाने काळ महामार्ग देखील अडवून धरला होता. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत मृतदेह मोहोळ येथील शासकीय रुग्णलयात हलविले आहे. तर जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णलायात आणण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT