खळबळजनक! जमिनीच्या वादातुन नातवानेच केला आजोबाचा खून  रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

खळबळजनक! जमिनीच्या वादातुन नातवानेच केला आजोबाचा खून

शिरूर तालुक्यामधील केंदूर येथील नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : शिरूर Shirur तालुक्यामधील केंदूर Kendoor येथील नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. शेताच्या वादातून नातवानेच चक्क आजोबांचा खून केला आहे. यामुळे परिसरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Grandson killed his grandfather land dispute

शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय- ६९) रा.केंदूर ताथवडेवस्ती ता. शिरूर असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी (वय- ३६) रा. केंदुर ता. शिरूर हा त्यांचा नातू आहे. पोलिसांनी Police दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री ९ :३० सुमारास घडली आहे. शेताच्या कारणावरून थोडा वाद झाला.

हे देखील पहा-

यानंतर भरतने आजोबांच्या घरी जाऊन शेताला काट्या लावता काय... अशी विचारणा केली, व नंतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आता तुला खल्लासच करतो, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून आजोबांच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर तसेच मांडीवर दगडाने आणि लाकडी चौरंग टेबल फॅनने Table fan मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. Grandson killed his grandfather land dispute

यामध्ये आजोबा जागीच मृत्युमुखी पडले. दरम्यान निर्मला शंकर ताथवडे (वय- ५५) रा. ताथवडेवस्ती केंदुर यानी भांडण सोडवण्यास गेले असता, त्यांना देखील भरतने मारहाण केल आहे. घटनास्थळी शिक्रापूर Shikrapur पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेनंतर आरोपी Accused फरार झाला, असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT