Grampanchayat Election Result 2022, Uday Samant, Kokan News  saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2022 : 'मविआ' समाेर शिंदे गटाच्या मंत्र्याचा गड ढासळला

रविवारी राज्यात झालेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे एकेक निकाल जाहीर हाेऊ लागेल आहेत.

अमोल कलये

Grampanchayat Election Result 2022 : राज्यात रविवारी विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. आज (साेमवार) एकेक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर हाेऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटास रायगड पाठाेपाठ रत्नागिरी जिल्ह्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीत उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या गटापुढं मविआचे पॅनेल वरचढ ठरलं आहे. (Maharashtra News)

रत्नागिरीत सर्वात मोठी ग्रामपंचायत शिरगावमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फरीदा काझी या विजयी झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांना व त्यांच्या गटास माेठा धक्का मानला जात आहे. काझी यांच्या विजयानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. (Uday Samant Latest Marathi News)

त्यानंतर पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला. या ठिकाणी सरपंच म्हणून ठाकरे गटाच्या ममता जोशी यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. जाेशी यांचा विजय हा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गटास धक्का मानला जात आहे. (Breaking Marathi News)

या दाेन धक्क्यातून उद्योगमंत्री उदय सामंत हे सावरत असतानाच त्यांना फणसोप ग्रामपंचायतीच्या निकालात तिसरा धक्का बसला. या ठिकाणी ठाकरे गटाची सत्ता आली. येथे राधिका साळवी सरपंच म्हणून विजयी झाल्या आहे. या ग्रामपंचायतीवर 11 पैकी 10 सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहेत. फणसोप हे राजन साळवी यांचं गाव आहे. (Grampanchayat Election Result 2022 Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT