vaibhav pichad, madhukar pichad , gram panchayat election result 2022, nagar , akole, rajur  saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022 : राष्ट्रवादी पुन्हा; जनतेनं त्यांच्या ४० वर्षांच्या वर्चस्वाला दिला धक्का

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पक्षाचं वर्चस्व सिद्ध केले.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील विविध जिल्ह्यात रविवारी ग्रामपंचायतींसाठी (grampanchayat) मतदान झालं. आज सकाळी दहा पासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीचा एकेक निकाल समजताच उमेदवारांसह त्यांचे समर्थक जल्लाेष करीत आहेत. राजूर ग्रामपंचयातीवर गेली ४० वर्ष वर्चस्व असलेल्या आणि भाजपात गेलेल्या पिचड पिता पुत्रांना यंदाच्या निवडणुकीत जनतेनं साफ नाकारलं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (ncp) उमेदवारानं सरपंच पदासाठी बाजी मारली आहे.

आज सकाळपासून प्रतिष्ठेच्या राजूर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता जनतेला लागली हाेती. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला धक्का दिला. मविआचा आजचा विजय हा मधूकर पिचड आणि वैभव पिचड या पिता-पुत्रांच्या ४० वर्षांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

सरपंचपदासाठी झालेल्या यंदाच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या पुष्पाताई निगळे यांनी बाजी मारली. या पदासाठीची माेजणी (फेर माेजणी) पुन्हा घेण्यात आली. त्यामुळे निकालाला उशीर लागला. निगळे या 19 मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पक्षाचं वर्चस्व सिद्ध केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हॉटेल व्यवसाय व्यवसायावर बंदीचा हॉटेल कामगारांना बसणार थेट फटका

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT