Gram Panchayat Election 2022 Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Election : सरपंचपदाचे आरक्षण रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका, सोमवारी येणार निर्णय

नागपूर जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Gram Panchayat Election 2022 : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. अशातच नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच ओबीसी सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांच्या वर गेल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. कामठी तालुक्यातील सुरादेवीचे सरपंच सुनील दुधपचारे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

त्यांच्या या याचिकेवर ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणुक आयोगातर्फे उत्तर दाखल दाखल करण्यात आलं असून सोमवारी उच्च न्यायालयाचे नागपूर नागपूर खंडपीठ याबाबतचा निर्णय देणार आहे. त्यामुळे सोमवारी खंडपीठ काय निर्णय देणार, याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. (Maharashtra Politics News)

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली होती. ४ महिन्यापूर्वी शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहेत. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्रामपंचायतींमध्येही पाहायला मिळणार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT