राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट  Saam Tv News
महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट

राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी आज महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये कोंडाळकर वाडीला भेट दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये कोंडाळकर वाडीला भेट दिली. या दुर्घटनेची पाहणी केली तसेच शोध, बचाव कार्य आणि सद्यःस्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केली. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना राज्यपालांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (Governor Bhagat Singh Koshyari's visit to the afflicted Taliye village)

हे देखील पहा-

पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अशोक दुधे यावेळी उपस्थित होते. ही दुर्घटना अभूतपूर्व अशी आहे. अशा दुर्घटना क्वचितच घडतात. संपूर्ण गाव आणि कुटुंब नष्ट होणे ही खूपच दुर्दैवी बाब आहे. आपल्या सर्वांनाच याचं दुःख आहे. पंतप्रधानांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीदेखील भेट देऊन गेले. पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकार मिळून या गावाचे सुयोग्य पद्धतीने पुनर्वसन करतील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवं आहे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT