राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हिंगोली दौरा संदीप नागरे
महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हिंगोली दौरा

हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, आदिवासी भागातील समस्या व सिंचनाच्या प्रश्नावर घेतली बैठक व प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप नागरे

हिंगोली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत, आज सकाळी राज्यपाल हे नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले. कोश्यारी यांनी शासकीय विश्रामग्रह हिंगोली येथील सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

हे देखील पहा -

या बैठकीत आदिवासी भाग असलेल्या कळमनुरी तालुक्यातील अनेक कामांचा आढावा त्यांनी घेतला. सोबतच हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर देखील, अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बैठकीनंतर राज्यपालांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधला.

आपण मराठवाड्याच्या दौर्‍यावर विविध विषयांची माहिती घेण्याकरिता आलो असून, संविधानात राज्यपाल यांना अशी माहिती घेण्यासाठी अधिकार असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. मराठवाड्यात प्रामुख्याने आदिवासी भागात सुरू असलेली विकासकामे, त्यासोबतच सिंचनाची सुद्धा अनेक कामे सुरू आहेत. या भागात अनेक समस्या असून, या सर्व समस्या राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT