Eknath Shinde and Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Eknath Shinde: "मी कृषी मंत्री असताना कधी निर्यात शुल्क ४०% लावले नव्हते..."; CM शिंदेंच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

Eknath Sinde:शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरत आंदोलने केली.

Ruchika Jadhav

Maharashtra News:

राज्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केलंय. यामुळे बाजारात कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग देखील संतप्त झालाय. शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरत आंदोलने केली. त्यामुळे केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

अशातच कांदा प्रश्नावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर हल्लाबोल करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कांद्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना टोला लगावला आहे. कृषी मंत्री असताना उपस्थित राहिलेल्या कांदा प्रश्नाची आठवण शिंदेंनी पवारांना करुन दिली आहे. यावर शरद पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मी कृषी मंत्री असताना कधी निर्यात शुल्क ४०% लावले नव्हते, अशा शब्दांत पवारांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आज लावलेले निर्यात शुल्क सरकारने रद्द करावेत. अशी भूमिका देखील शरद पवारांनी घेतली आहे.

केंद्र सरकराने कांद्याला प्रतिक्विंटलला दिलेला भाव हा उत्पादन खर्च काढणाराही नाही, असं शरद पवार म्हणाले. कांदा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. परिणामी सरकारने निर्यात शुल्क कमी करावं, असंही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं होतं?

केंद्र सरकारने पहिल्यांदा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदतीसाठी कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.

शरद पवार मोठे नेते आहेत. पवार साहेबही १० वर्ष कृषिमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांबाबत अशी परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा असा निर्णय कधी घेतला गेला नाही. काही सूचना असतील तर त्यांनी सरकारला कराव्यात. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

Gautami Patil : गौतमी पाटील,अलका कुबल अन् सई ताम्हणकर स्क्रिनवर एकत्र झळकणार? 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT