shinde Group 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सरकारी अधिकारी दारु पिऊन कार्यालयात, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिकवला धडा

Maharashtra Politics: जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात अधिकारी ऑन ड्यूटी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले आहेत.

Dhanshri Shintre

धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात अधिकारी ऑन ड्यूटी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले आहेत. शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या नशेखोर अधिकाऱ्याचा सर्व प्रकार उघडकीस आणला.

जिल्हा उद्योग केंद्रातील प्रभारी ग्राम उद्योग अधिकारी विजय चाटी असे मद्यधुंद अधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने अधिकारीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विजय चाटी हे नेहमीच कार्यालयात दारू पिऊन येत असल्याची नागरिकांनी शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

गेल्या काही दिवसापासून विजय चाटी हे कार्यालयात दारूच्या नशेत असतात अशी तक्रार आली असता शिवसेनेने त्याची दखल घेत मद्यधुंद असलेल्या विजय चाटी यांना जाब विचारला, मात्र ते दारूच्या नशीब असल्याने ते उत्तर देऊ शकले नाहीत, त्यांनी धुम्रपान देखील केलेले होते, त्यामुळे कार्यालय संपूर्ण घाण झाली असल्याचे दिसून आले आहे, या नशेखोर अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला देखील नेहमीच सेवन केला जात असल्याचे दिसून आले आहे, अनेक नागरिक बेरोजगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र त्यांची काम होत नाही, असं असताना अधिकारी जर दारू पिऊन कार्य देत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत शिवसेने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दारूसह महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा खाऊन कार्यालयात संबंधित अधिकारी सर्रासपणे सेवन करत असल्याचे देखील आले उघडकीस आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नातेवाईक असून भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे सर्व निकटवर्तीय असल्याने माझे कोणीही काही करू शकत नसल्याचे मद्यधुंद अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Kumbha Rashi: कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा असेल? प्रेमात खटके, पण समाजात मिळेल नवी ओळख; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT