Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: जरांगेंचा इशारा, सरकारचं दुर्लक्ष; विधानसभेलाही आरक्षणाचा मुद्दा पेटणार

Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलाय. मराठा-ओबीसी आमनेसामने आलेत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आचारसंहितापूर्वी आरक्षण देण्याची मागणी केली.

Girish Nikam

गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष पेटलाय. स्वतंत्र मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याच्या भीतीमुळे ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी जरांगेंनी केलीय. त्यामुळेच सगेसोय-यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही जरांगेंनी केली. जरांगेंनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचा मुहूर्तावर १७ सप्टेंबरपासून सातवं आमरण उपोषण सुरु केलं होतं.

मात्र प्रकृती खालावल्याने उपोषण स्थगित केलं. त्यानंतर नारायणगडावरील दसरा मेळाव्यातही त्यांनी सरकारला इशारा दिला. आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण द्या, असा सज्जड इशारा सरकारला दिला आहे. मात्र सरकार दखल घेत नसल्याचं चित्र आहे.

कारण विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा आणि निर्णयांचा धडाका सुरू आहे. तब्बल 80 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

राज्यात आरक्षणावरुन मराठा-ओबीसी असा संघर्ष सुरु असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचं आरक्षण नसणार, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय. अकोल्यात झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आरक्षणाची मर्यादा थेट ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी शरद पवारांनी केंद्राकडे केलीय. लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्याचा महायुतीला मोठा फटका बसलाय. त्यानंतरही मराठा आरक्षणाचा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. जरांगेंचा प्रभाव आणि त्यांच्या इशारा पाहता आरक्षणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणार एव्हढं मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT