लाचलुचपत विभागाने आवळल्या शासकीय अभियंत्यांच्या मुसक्या  भूषण अहिरे
महाराष्ट्र

लाचलुचपत विभागाने आवळल्या शासकीय अभियंत्यांच्या मुसक्या

अमळनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता सत्यजीत गांधलीकर आणि शाखा अभियंता दिनेश पाटील या दोघांनी तक्रारदाराकडून लाच मागितली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : मागील मंजुर कामांचे धनादेश काढण्यासाठी सुमारे अडीच लाखांची लाच मागणाऱ्या अमळनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांपैकी एकाला धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. Government Engineers Arrested by ACB

हे देखील पहा -

अमळनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता सत्यजीत गांधलीकर आणि शाखा अभियंता दिनेश पाटील या दोघांनी तक्रारदाराकडून लाच मागितली होती. तक्रारदारांची बांधकाम क्षेत्राशी निगडित कंपनी असून कंपनीने केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी २ लाख ५८ हजार रुपयांची लाच मागीतली होती.

तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार ८ जून २०२१ ला दिनेश पाटीलने ९८ हजार तर सत्यजीत गांधलीकरने १ लाख ६० हजार रुपयांची मागणी तक्रारदारांकडे चेक काढण्यासाठी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एन्टीकरप्शन विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आज एसीबीच्या पथकाने या दोन्ही लाचखोर अभियंत्यांना अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT