Government employees caught in Ladki Bahin scheme fraud; ₹15 crore recovery ordered. Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Maharashtra Government Welfare Scheme: लाडकी बहिण योजनेत हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी घुसखोरी केली आहे. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. कारण बोगस लाभार्थ्यांकडून पैसे तर वसूल केले जाणार आहेतच त्याशिवाय या सरकारी 'लाडकी'ला कसा दणका बसणार आहे?

Girish Nikam

लाडकी बहिण योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांची प्रत्येक जिल्ह्यात छाननी सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला काही शेकड्यांत असलेली लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या आता हजारोंवर पोहोचली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे वार्षिक अडीच लाख उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट निकष असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं उघड झालंय.

महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत बोगस लाभार्थ्यांबाबत आढावा घेण्यात आला. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आता 8 हजारांवर गेली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची यादीच सोपविली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्तविभागाने संबंधित विभागांना दिले आहेत. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात आहे. केवळ लाभाची वसुली नाही तर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे

लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीय मात्र 1500 रुपयांसाठी कर्मचाऱ्यांकडूनच शासनाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे हे पैसे थेट त्यांच्या पगारातूनच कापले जाणार आहेत. महाराष्ट्र दिवाणी नियम १९७९ यानुसार महिला कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. एवढंच नाही तर बोगस लाभार्थ्यांबाबत ‘पेन्शन’ विभागालाही पत्र पाठवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना सरकारी तिजोरीतूनच पैसे लुटणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोर जावं लागणार हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Homemade Facepack : चाळिशीनंतरही चेहरा दिसेल तरुण; लावा 'हा' फेसपॅक, तुमच्याच सौंदर्याचे होईल कौतुक

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

SCROLL FOR NEXT