Goshta Paishapanyachi Book SAAM TV
महाराष्ट्र

गोष्ट पैशापाण्याची: इंग्रजीबहुल दुकानात मराठी पुस्तकाला मानाचं स्थान

अर्थ साक्षरता अगदी सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या 'गोष्ट पैशापाण्याची' या मराठी पुस्तकाला इंग्रजीबहुल दुकानात मानाचं स्थान मिळालं आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Goshta Paishapanyachi Book : अर्थ साक्षरता अगदी सोप्या भाषेत समजून सांगणारा आणि प्रकाशनापूर्वीच विक्रमाला गवसणी घालणाऱ्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकानं आणखी एक मान मिळवला आहे. इंग्रजीबहुल दुकानात या मराठी पुस्तकाला मानाचं स्थान मिळालं आहे.

उद्योजक आणि लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 'सकाळ प्रकाशन'नं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. गरीब 'गरीब' का आहेत आणि श्रीमंत 'श्रीमंत' का आहेत याचं उत्तम विश्लेषण असलेल्या या पुस्तकात जुन्या समजुतींना तडा देत नवीन विचार मांडले आहेत. अर्थ साक्षरता आणि त्याबद्दल सोप्या भाषेतच कुंडली मांडलेली आहे. (Marathi Book)

इंग्रजीबहुल दुकानातही मराठी पुस्तकाचा बोलबाला

गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकानं क्रॉसवर्डसारख्या इंग्रजीबहुल दुकानातही मानाचं स्थान मिळवलं आहे. लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

क्रॉसवर्डसारख्या इंग्रजीबहुल दुकानात आपल्या मराठी पुस्तकाला जो सन्मान मिळतोय, त्याचे संपूर्ण श्रेय हे आपल्या मातीतल्या सूजाण वाचकांचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यांनी सकाळच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी आभार मानलेत. सामान्य माणसांना आर्थिक साक्षर करण्यासाठी तुमच्या तळमळीचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया एका वाचकानं दिली आहे.

विक्रमी झेप

‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक बाजारात विक्रीला येण्यापूर्वीच तब्बल १८ हजार पुस्तक नोंदणीचा विक्रम नोंदवला होता. अॅमेझॉनवरील (Amazon) विक्रमी पहिल्या तीन पुस्तकांच्या यादीत या पुस्तकानं स्थान मिळवलं आहे.

विशेष म्हणजे मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये पुस्तकाची एक आवृत्ती साधारण १ हजार प्रतींची असते. पण गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकानं हे सर्व विक्रम मोडले. पुस्तकाची पहिली आवृत्ती ही ३० हजार पुस्तकांची आहे. हा देखील एक विक्रम असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT