gor sena banjara samaj rasta roko andolan at pahur jamner jalgoan  saam tv
महाराष्ट्र

Gor Sena Morcha : गोर सेनेचा पहूरमध्ये माेर्चा, आंदाेलकांनी फाेडल्या वाहनांच्या काचा; पाेलिसांनी कुमक वाढवली

आंदोलकांनी तब्बल अडीच ते तीन तास महामार्ग रोखून धरल्याने छत्रपती संभाजीनगर जळगाव व बऱ्हाणपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

संजय महाजन

Jalgaon News :

विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी आज (मंगळवार) गोर सेना व बंजारा समाज बांधव जळगाव जिल्ह्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जामनेर तालुक्यातील पहूर गावात गोर सेनेच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढला. यावेळी माेर्चेक-यांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर व भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन केले. काहींनी वाहनांचे नुकसान देखील केले. (Maharashtra News)

पहुर येथे गोर सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या माेर्चामध्ये माेठ्या संख्येने बंजारा समाजातील लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सहभागी झाले हाेते. घाेषणाबाजी करीत मोर्चेकरी पुढे पुढे सरकत हाेते.

या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण देखील लागल्याचे पाहायला मिळाले. संतप्त झालेले काही आंदोलकांनी भाजपाचे चिन्ह असलेल्या गाड्यांचा काचा फोडल्या. यामुळे आंदोलन स्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलकांनी तब्बल अडीच ते तीन तास महामार्ग रोखून धरल्याने छत्रपती संभाजीनगर जळगाव व बऱ्हाणपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान आंदाेलकांची भूमिका लक्षात घेता जादा पाेलिस बंदाेबस्त घटनास्थळी मागविण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT