State Government Employees DA Hike Saam TV
महाराष्ट्र

DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ; थकबाकीही मिळणार

Maharashtra DA Hike News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ; थकबाकीही मिळणार

Satish Kengar

Maharashtra Government Employees DA Hike:

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच १ जुलै पासून राज्य शासकिय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिन कर्मचार्यांच्या वेतनात ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर 43% हून ४६% करण्याचा शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थकबाकीही मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने हा महागाई भत्ता १ जुलै २०२३ पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ पासून ते ३१ आक्टोंबर २०२३ या कालावधतील थकबाकीसह नोव्हेंबर २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

याबाबतच्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे?

याबाबत जरी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे की, ''राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.''

यात पुढे लिहिलं आहे की, ''शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. हा महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

ODI ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा; प्रिन्स गिलने किंग कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर?

EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT