Gondia : बियर बार चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक! SaamTvNews
महाराष्ट्र

Gondia : बियर बार चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक!

चोरट्यांनी महागड्या दारूच्या बाटल्या लंपास केल्या होत्या.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे असलेल्या साई सर्वेश्वर या बिअर बारमध्ये चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी येथील बारमध्ये ठेवलेल्या महागड्या दारूच्या (Liquor) बाटल्यांसह काऊंटर फोडून रोख रक्कम व संगणक असा सुमारे 1 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

हे देखील पहा :

बारमालकाच्या (Beer Bar) तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हेगारी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू असताना अखेर सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करून पोलीस खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. या चोरीच्या प्रकरणात दीपक राणा आणि सुशांत मिस्त्री नावाच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गोंदियातील वडसा शहरातून ह्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींस न्यायालयात हजर करून त्यांनी लंपास केलेल्या महागड्या दारूच्या बाटल्यांसह 1 लाख 5 हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT