Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News : भाजपचा अध्याय येणाऱ्या निवडणुकीत जनता बंद करेल; नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात

Gondia News : राज्य सरकार मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे सरकार असल्याची टीका राज्य सरकारवर केली आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: केंद्र सरकारने जी स्क्रिप्ट लिहून दिली होती. तीच स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाचली आहे. मात्र (Gondia) भाजपचा सुरु असलेला अध्याय येणाऱ्या निवडणुकीत जनता बंद करेल; अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर  केला आहे. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महायुती सरकारचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देत मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये दिले होते, असा दावा केला. यावर नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरत, तेव्हा १ कोटी दिले होते. म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात टोल वसुली करता का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकार मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे सरकार असल्याची टीका राज्य सरकारवर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून सागर बंगल्याचे चक्कर मारणं सुरू आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सागर या शासकीय बंगल्याचा अपमान करण्याचे काम भाजपचे लोक करत आहेत. आम्ही काही पण केले, तर आमच्या बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं सांगतात. त्यामुळे भाजपचे लोक एक प्रकारे सागर या शासकीय बंगल्याचा अपमान करत आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT