Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया-आमगाव मार्ग बंदच; पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ

Gondia News: सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया-आमगाव मार्ग बंदच; पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदिया शहर व परिसरात शुक्रवार पहाटेपासूनच पावसाने जोर (Rain) धरला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची (Gondia) स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नदी, नल्याना पाणी आले आहे. यात पांगोली नदीवर असलेल्या पर्यायी पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने सलग तीन दिवसांपासून पुलावरील वाहतूक बंद आहे. (Tajya Batmya)

गोंदिया शहरासह परिसरात सततच्या पावसामुळे जलाशये, तलाव आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या दरम्यान आमगाव- गोंदिया मार्गावरील पांगोली नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी जात असल्यामुळे शनिवारी आणि आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही वाहतूक बंदच आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पूर ओसरला असला तरी रविवारी देखील वाहतूक सुरू होणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

दुसऱ्या मार्गाने वळविली वाहतूक 

सततच्या पावसामुळे शिवार जलमय झाले. तलाव, नद्या, नाल्यांतील पाणी पातळीत वाढ झाली. पांगोली नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. शुक्रवारी सकाळपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील पर्यायी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. आमगाव मार्गावरील वाहतूक तुमखेडा आणि चुलोद मार्गाने वळविण्यात आली. रविवारीदेखील पांगोली नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक सध्या बंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skirt Top for Girls: कॉलेज आणि ऑफिसाठी ट्राय करा हे ७ लेटेस्ट ट्रेंडी स्कर्ट टॉप; मिळेल फॅशनेबल ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: जालन्यात कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Shirwale Recipe: कोकणातील स्पेशल नारळाच्या दुधातील शिरवाळे कसे बनवायचे? वाचा रेसिपी

Marathi Bhasha Din History : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी; मराठी भाषेचा इतिहास काय? कवी कुसुमाग्रजांविषयी ही माहिती प्रत्येकाने एकदा वाचाच

Kokam Sharbat Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT