Gondia News 4-year-old Baby died after falling into a pit dug by Khamkhura Gram Panchayat  Saam TV
महाराष्ट्र

Gondia News: ४ वर्षीय गोंडस चिमुकला खेळता-खेळता खड्ड्यात पडला; आईने धाव घेण्यापर्यंत अनर्थ घडला

Gondia Marathi News: ग्रामपंचायत परिसरात खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही

Gondia News Today: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत परिसरात खोदलेल्या खड्ड्यात पडून एका ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास खामखुर्रा गावात (Gondia News) घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

चिराग हिवराज कोड्डे (वय ४ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामखुर्रा गावातील ग्रामपंचायत आवारात (Gram Panchayat) संरक्षण भिंतीच्या कॉलमसाठी भलामोठा खड्डा खोदण्यात आला होता. मुसळधार पाऊस झाल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते.

दरम्यान, चिराग हा गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अंगणात खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक या खड्ड्यात पडला. गावातील नागरिकांनी चिरागला पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच चिरागचा मृत्यू झाला होता. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका चिमुकल्याचा जीव गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Thane Water Crisis : ठाण्यात जलसंकट! या महत्वाच्या भागांत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT